पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्टर लावणाऱ्यांविरोधात १०० एफआयआर दाखल; सहा जणांना अटक  

नवी दिल्ली –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्टर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या संदर्भात 100 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. स्पेशल सीपी दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, पोस्टरवर प्रिंटिंग प्रेसचा तपशील नव्हता. आम आदमी पार्टीच्या कार्यालयातून निघालेली एक व्हॅन अडवण्यात आली. काही पोस्टर्स जप्त करून अटक करण्यात आली.(100 FIRs filed against those putting up offensive posters against PM Modi; Six people were arrested).

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या काही भागात ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असे शीर्षक असलेले पोस्टर्सही लावण्यात आले होते. विशेष सीपी दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी 100 हून अधिक एफआयआर नोंदवले आहेत, तर शहरभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्टर लावल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोस्टर्सवर छापखाना किंवा प्रकाशकाचा उल्लेख नव्हता. पोलिसांनी सांगितले की, शहरातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रिंटिंग प्रेस कायदा आणि मालमत्ता गैरव्यवहार कायद्याच्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. कार्यालयातून बाहेर पडताच एक व्हॅनही थांबवण्यात आली. काही पोस्टर्स जप्त करून अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.