पुण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीची निर्घृण हत्या हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण – अजित पवार

पुण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीची निर्घृण हत्या हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण – अजित पवार

मुंबई : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थीनीची कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे.

शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत असे अजित पवार म्हणाले.

Previous Post
‘सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का ?’

‘सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का ?’

Next Post
जाणून घ्या घराघरात पोहचलेल्या जिलेट कंपनीची यशोगाथा

जाणून घ्या घराघरात पोहचलेल्या जिलेट कंपनीची यशोगाथा

Related Posts
हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मिळाला 43 कोटी रुपयांचा निधी

हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मिळाला 43 कोटी रुपयांचा निधी

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या  पुरवणी यादीत चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी 43 कोटी रुपयांचा निधी…
Read More
daya

‘दया’ तोडणार आता मराठी चित्रपटाचे दार; लवकरच दिसणार पडद्यावर

मुंबई : नवीन चेहऱ्यांच्या जोडीला हिंदी-साऊथमध्ये गाजलेले चेहरे नेहमीच मराठी चित्रपटांमध्ये लक्ष वेधणारे ठरले आहेत. आज मराठी चित्रपटांची…
Read More

दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर गुणवत्तेवर, पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोग निर्णय घेईल – सुनिल तटकरे

Sunil Tatkare- आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेवर युक्तिवाद करण्याचा त्यांनाही तितकाच अधिकार आहे. त्यामुळे…
Read More