वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी

मुंबई / चंद्रपुर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे.

वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – अजित पवार

Next Post

अभिनेत्री कंगना रनौतची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट 

Related Posts
सीमा हैदर यूट्यूबवरुन दर महिन्याला किती कमावते? पाकिस्तानी भाभीने केला खुलासा

सीमा हैदर यूट्यूबवरुन दर महिन्याला किती कमावते? पाकिस्तानी भाभीने केला खुलासा

Seema Haider Youtube Earning:- पाकिस्तानमधील चार मुलांसह भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) सध्या सचिन मीनाबरोबर (Sachin Meena)…
Read More
आता सुट्टी नाहीच; महाराष्ट्रात बांगलादेशींचा घरोघरी शोध घेतला जाणार

आता सुट्टी नाहीच; महाराष्ट्रात बांगलादेशींचा घरोघरी शोध घेतला जाणार

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर, महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांच्या ( Bangladeshi citizen) घरोघरी शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…
Read More
अंकिता लोखंडे लवकरच बनणार आहे आई? झाला मोठा खुलासा | Ankita Lokhande

अंकिता लोखंडे लवकरच बनणार आहे आई? झाला मोठा खुलासा | Ankita Lokhande

कलर्स टीव्हीच्या कुकिंग रिॲलिटी शो ‘लाफ्टर शेफ’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अंकिता लोखंडे-विक्की जैन, ( Ankita Lokhande)…
Read More