नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर 16 आमदार निलंबित झाले असते : पवार

Mumbai – राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. त्यानुसार राज्यातल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी विश्वास दर्शक ठरावाला सामोरं न जाता स्वतःहून पदाचा राजीनामा दिला; त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत निकाल द्यावा, अशी सूचनाही; सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा (Chief Justice Justice Dhananjay Chandrachud, Justice M. R. Shah, Justice Krishna Murari, Justice Hima Kohli and Justice P. S. Narasimha) यांच्या घटनापीठाने केली.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. त्यावेळच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी कोणाला न सांगता राजीनामा दिला.  तो द्यायला नको होता. राजीनामा दिल्यावर कळलं की राजीनामा दिला.  त्यानंतर रिक्त झालेलं हे पद महाविकास आघाडीकडून तातडीने भरलं गेलं नाही. ते भरलं गेलं असतं तर 16  आमदार अपात्र ठरले असते. मी याबाबत कोणाला दोष देत नाही पण महाविकास आघाडीकडून हे पद भरायला हवं होतं. असं म्हणत नाना पटोले यांच्याकडे अंगुलीनिर्देश अजित पवार यांनी केला आहे.