मैत्रिणीसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणाची हत्या, डोक्यात बिअरची बाटली फोडली

कायदा  सुव्यवस्थेचे तीन तेरा;  भरदिवसा तरुणाच्या हत्येने पुणे हादरलं

पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील वडगांव बुद्रुक येथे मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घालून खून करण्यात आला आहे. नागेश सिद्धाप्पा चिंचोळे (वय १७, रा. जाधव नगर, वडगाव बुद्रुक, पुणे) असे खून (minor boy murder Pune) झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk murder) येथे घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश हा वडगाव बुद्रुक इथल्या पाऊंजाई मंदिर पाठीमागील घुले नगर परिसरात असणाऱ्या मोकळ्या प्लॉटमध्ये आपल्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत बसला होता. दरम्यान त्या ठिकाणी एका तरुणाने येऊन नागेश याच्या डोक्यात बिअरची बाटली आणि झाडाची कुंडी घातली. अचानक झालेल्या हल्ल्यात नागेशचा जागीच मृत्यू झाला. प्रेमप्रकरणातून हा खून घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रेमप्रकरणातून हा खून घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.