Sangita Thombre | राज्यात येत्या २-३ महिन्यांत विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्यादृष्टीने सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान केज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी उमेदवारीला उभे राहण्याची इच्छा दर्शवली आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवारी दिली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांच्याकडून प्रा. संगीता ठोंबरे पराभूत झाल्या. मात्र, पुढच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांचा पराभव करुन ठोंबरे यांनी भाजपच्या आमदार झाल्या.
पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) संगीता ठोंबरे (Sangita Thombre) यांना उमेदवारी नाकारुन त्यावेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नमिता मुंदडा यांना रिंगणात उतरविले. दरम्यान, आम्ही पाच वर्षे थांबलो, आता मात्र 2024 मध्ये पक्षाने आपणास पुन्हा एकदा संधी दिली तर आपण केज विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे ठोंबरे म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना संगीता ठोंबरे म्हणाल्या, मी गावोगावी फिरत असून लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझी विधानसभेला उभे राहण्याची इच्छा आहे. २०१९ ला पंकजा मुंडे ताईंच्या सांगण्यावरून थांबले आताही त्याच संधी देतील, असा विश्वास संगीता ठोंबरेंनी व्यक्त केला. मांजरा धरणात 3 टीएमसी पाणी आणणे, एमआयडीसी उभी करणे, सूत गिरणीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, अंबाजोगाई जिल्हा निर्मीतीसाठी प्रयत्न असे नवे व्हिजन घेऊन आपण पुन्हा मैदानात उतरू असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप