भाऊ नवी स्कॉर्पिओ आली ना…, ‘या’ महिन्यात होणार लॉंच !

नवी दिल्ली : महिंद्राने 2022 Scorpio ची लॉन्च तारीख शेअर केलेली नाही, परंतु असा अंदाज आहे की कंपनी जून 2022 पर्यंत ही नवीन कार भारतात लॉन्च करू शकते.

ही आइकॉनिक SUV कार 20 जून 2002 रोजी प्रथम लॉन्च झाली होती. भारतात पुढील वर्षी जूनमध्ये ही कार लॉंच झाल्याचे 20 वर्ष पूर्ण होतील. अशात आता कंपनी या धाकड कारला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुढील वर्षी महिंद्र स्कॉर्पिओचे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च करू शकते.

महिंद्राच्या या कॉम्पॅक्ट SUV कारला आत्तापर्यंत अनेक अपडेट्स मिळाले आहेत, पण अजून नवीन जनरेशनचे अपडेट मिळणे बाकी आहे. हे अपडेट आता 2022 च्या स्कॉर्पिओच्या लॉंचसह दिसेल.

फीचर्स आणि डिझाईनच्या तुलनेत या सेगमेंटमध्‍ये ही कार इतर कारच्‍या तुलनेत खूप मागे आहे, परंतु तरीही गेल्या सहा महिन्‍यांमध्‍ये (मे-ऑक्‍टोबर 2021) सरासरी 3000 युनिट्ससह तिसरी बेस्ट-सेलर कार ठरली आहे.

2022 स्कॉर्पिओ अपडेट केलेल्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. ही कार अधिक प्रीमियम एक्सटीरियर डिझाइनसह येणार आहे. नवीन स्कॉर्पिओमध्ये डिझाइन इंटीरियर नवीन डॅशबोर्ड लेआउटसह दिले जाणार आहे. महिंद्रा आपल्या आगामी स्कॉर्पिओमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर 7-इंच डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, सनरूफ आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल मिळेल. कॅमेर्‍यात टिपलेल्या स्कॉर्पिओच्या नवीन छायाचित्रांनी पुष्टी केली आहे की यामध्ये थ्री रो सीट्स, ऑल फेसिंग फॉरवर्ड आणि मिडल रो मध्ये पर कैप्टेन सीट्स असतील

अतिरिक्त सुरक्षा, प्रगत तंत्रज्ञान आणि शक्तिशाली कामगिरीमुळे भारतातील नवीन महिंद्रा स्कॉर्पिओची किंमत 2002 मध्ये लाँच केलेल्या स्कॉर्पिओपेक्षा जास्त ठेवली जाऊ शकते. या धान्सू कारची किंमत 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊ शकते असा अंदाज आहे. या सेगमेंटमध्ये स्कोर्पिओची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos , Skoda Kushak, MG Aster आणि Volkswagen Tigon शी होणार आहे.

हे देखील पहा