३३ वी राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धा – महिला इपी प्रकारात हरियाणाच्या प्राची लोहान हिने पटकाविले विजेतेपद

पुणे : महाळुंगे – बालेवाडी (Mahalunge – Balewadi) येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल (SHIV CHHATRAPATI SPORTS COMPLEX) येथे संपन्न होत असलेल्या ३३ वी राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिला इपी प्रकारात हरियाणाच्या
(Haryana) प्राची लोहान (Prachi Lohan) हिने विजेतेपद पटकाविले. प्राची हिने हरियाणाच्या तनिषा खत्री हिच्यावर (१५-१४) अशी मात केली.
या स्पर्धेला महिला ईपी प्रकरातील पूल फेरीने सुरूवात झाली. त्यानंतर ६४ ची फेरी, ३२ ची फेरी, १६ ची फेरी, ८ ची फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी संपन्न झाली.
प्राची हिने गेल्या वर्षी संपन्न झालेल्या ३२ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेत ७ वा क्रमांक मिळविला होता. यंदा ती वैयक्तिक ईपी प्रकारातील स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तर तनिषा खत्री हिने रौप्य पदक मिळविले. स्पर्धेत ईना अरोरा आणि तन्नू गुलीया यांना कांस्य पदक मिळाले.
महिला एपी स्पर्धेतील सामन्यांचे फेरीनिहाय निकाल :
- १६ ची फेरी
तनिषा खत्री वि. वि. राज पी के अस्वथी (१५-५)
ज्योतिका दत्ता वि. वि. शीतल दलाल (१५-१४)
ईना अरोरा वि. वि. साहू मोनिका (१५-१०)
सखीकोम देवी वि. वि. एम एस रेश्मा (१५-७)
यशकिरथ कौर वि. वि. बिदियाबती देवी (१५-१४)
प्राची लोहान वि. वि. कश्वी गर्ग (१५-१२)
के पी गोपिका वि. वि. रितू चौधरी (१५-८)
तन्नू गुलिया वि. वि. पूर्वशा पूर्वशा (१५-१२)
- ८ ची फेरी
तनिषा खत्री वि. वि. ज्योतिका दत्ता (१५-११)
ईना अरोरा वि. वि.सखीकोम देवी (१५-१४)
प्राची लोहान वि. वि.यशकिरथ कौर (१५-८)
तन्नू गुलिया वि. वि.के पी गोपिका (१५-६)
- उपांत्य फेरी
तनिषा खत्री वि. वि. इना अरोरा (१५-६)
प्राची लोहान वि. वि.तन्नू गुलिया (१५-१४)
- अंतिम फेरी
प्राची लोहान वि. वि.तनिषा खत्री (१५- १४)