महाराष्ट्रातील 3886 शेतकऱ्यांना मिळाला 33.30 कोटी रुपये हमीभावाचा लाभ !

modi

नवी दिल्ली : 2021-22 च्या खरीप विपणन हंगामात तांदळाच्या खरेदीची प्रक्रिया गेल्या वर्षाप्रमाणेच सुरळीतपणे सुरू आहे. या हंगामात 30.11.2021 पर्यंत महाराष्ट्र, चंदीगड, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगण, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून/केंद्रशासित प्रदेशांमधून 290.98 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. आतापर्यंत 18.17 लाख शेतकऱ्यांना रु.57,032.03 कोटी मूल्याच्या किमान हमीभावाचा लाभ मिळाला आहे.

सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात पंजाबमधून सर्वाधिक((18685532मेट्रिक टन) खरेदी करण्यात आली, त्याखालोखाल हरयाणा (5530596 मेट्रिक टन) आणि उत्तर प्रदेशमधून (1242593 मेट्रिक टन) खरेदी करण्यात आली. इतर राज्यांमध्येही खरेदी प्रक्रियेला वेग आला आहे. महाराष्ट्रात 3886 शेतकऱ्यांकडून 16,988 मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना 33.30 कोटी रुपये मूल्याच्या किमान हमीभावाचा लाभ मिळाला आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्रात 6,24,292 शेतकऱ्यांकडून 18,85,038 मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांना 3558.95 कोटी रुपये मूल्याच्या हमीभावाचा लाभ मिळाला होता.

2020-21 च्या खरीप विपणन हंगामात किमान 1,31,13,417 शेतकऱ्यांना 168823.23 कोटी रुपये मूल्याच्या किमान हमीभावाचा लाभ( 30.11.2021 पर्यंत) मिळाला होता आणि 89419081 मेट्रिक टनांची खरेदी झाली होती.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM&t=2s

Previous Post
kia car

किआचा धमाका : नोव्हेंबरमध्ये विकल्या ‘इतक्या’ कार !

Next Post
ipo

वर्षांचा शेवट होणार जोरदार, 10 मोठ्या कंपन्यांचे IPO बाजारात येणार

Related Posts
पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई! आमदार महेश लांडगेंनी सभागृहात वेधले लक्ष

पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई! आमदार महेश लांडगेंनी सभागृहात वेधले लक्ष

MLA Mahesh Landge | पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली-कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागपूर…
Read More

“आजवर छेड काढणाऱ्या ४ पोरांना धुतलंय…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा

Actress Surabhi Bhave: मराठी मनोरंजन सृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्त्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री सुरभी भावे हिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील…
Read More
Narendra Modi

मतदानाला जाताना गॅस सिलिंडरला हात जोडून नमस्कार करा; मोदींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई – देशातील महागाईने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल (Petrol and diesel) पाठोपाठ घरगुती एलपीजी सिलिंडरच्या…
Read More