अमरावतीमध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात  4 गुन्हे दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अमरावती – अमरावती येथील अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल (File FIR On MP Navneet Rana & MLA Ravi Rana) करण्यात आला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच  त्या काल अमरावतीत  पोहोचल्या होत्या. रस्त्यावर स्टेज बनवून रात्री उशिरा लाऊडस्पीकर वाजवल्याप्रकरणी (Making a stage on the street and playing loudspeakers late at night) त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती.

नवनीत राणा यांच्या 14 समर्थकांवरही गुन्हा दाखल (A case has also been registered against 14 supporters of Navneet Rana) करण्यात आला आहे.  अमरावती पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अमरावतीच्या चार पोलिस ठाण्यांमध्ये भादंवि कलम १४३, ३४१, वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, परवानगीशिवाय रॅली काढणे आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल (Crimes registered in four police stations in Amravati) करण्यात आला आहे. २९१ आणि १३५ अन्वये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.