Gadchiroli News | छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील कुगलेर इथल्या रहिवासी असलेल्या लक्ष्मी बंडे मज्जी नामक 42 वर्षीय नक्षलवादी महिलेनं नुकतंच गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केले. लक्ष्मी मज्जी 2017 मध्ये भामरागड दलम आणि इंद्रावती एरिया कमिटीमध्ये चेतना नाट्य मंचची सदस्य म्हणून भरती झाली.
आजतागायत ती तिथं कार्यरत होती. राज्य शासनानं तिच्यावर 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. तिचा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे काय, याविषयी पडताळणी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 2005 मध्ये आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 678 नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण (Gadchiroli News) केलं आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
चंद्रकांतदादांच्या पाठीशी कोथरुडकरांनी खंबीरपणे रहावे! माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे आवाहन
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अमित ठाकरे यांनी दिले असे उत्तर
..तर पुढील मुख्यमंत्री फडणवीसच! अमित शाहांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याचा दावा