औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : “मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर ‘त्वचेचा रंग उजाळते’ अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून 14 लाखांचा व नागपूर येथून 34 लाखांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व औषध नियंत्रण प्राधिकारी दा.रा. गहाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 106, अनुसूचीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याचे औषध निरीक्षक प्रशांत आस्वार व रासकर यांनी भिवंडी येथे तर नागपूर येथे औषध निरीक्षक महेश चौधरी यांनी साठा जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांनी औषधे व जादुटोणा आदी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 व नियम 1955 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 च्या तरतुदीचे उल्लंघन करणा-या जाहिराती प्रसिध्द करु नयेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास अन्न व औषध प्रशासनास हेल्पलाईन क्रमांक 1800222365 वर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता असणारी मार्जिन मनी योजना नेमकी आहे तरी काय ?

Next Post
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास खरच घटस्फोट घेणार ? जवळच्या मित्राने हा खुलासा केला

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास खरच घटस्फोट घेणार? जवळच्या मित्राने केला हा खुलासा

Related Posts
आम्हाला पवार साहेबांनी शिकवले आहे की अन्यायाविरुद्ध उभे रहा - Jayant patil

आम्हाला पवार साहेबांनी शिकवले आहे की अन्यायाविरुद्ध उभे रहा – Jayant patil

Jayant patil – शरद पवार यांची (Sharad Pawar) खरी राष्ट्रवादी ही शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर आहे. जर तुम्ही विकासासाठी तिकडे…
Read More

उजनीतील अवैध वाळू उपसा बंद करा, आमदार नारायण पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पञ

MLA Narayan Patil | करमाळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू आहे.…
Read More
बदला घेण्यासाठी तो देवी-देवतांचे आक्षेपार्ह फोटो शेअर करायचा, पण पोलिसांनी त्याला पकडलेच 

बदला घेण्यासाठी तो देवी-देवतांचे आक्षेपार्ह फोटो शेअर करायचा, पण पोलिसांनी त्याला पकडलेच 

सोशल मीडियावर हिंदू देवी-देवतांची आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट करणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या IFSO टीमने अटक केली आहे.…
Read More