मुंबईत आयोजित ‘धर्मवीर 2’ च्या ट्रेलर (Dharamveer 2 trailer ) लॉन्च इव्हेंटला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. ‘धर्मवीर’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. गोविंदा, जितेंद्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रेलर लाँचला हजेरी लावली, सलमान खान देखील या कार्यक्रमाला हजर होता. या ट्रेलरमधील (Dharamveer 2 trailer ) अनेक संवाद हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना डिवचणारे असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
चित्रपटात उद्धव ठाकरेंना डिवचणार कोणते डायलॉग?
* छत्रपती शिवरायाचं स्वप्न होता हा भगवा रंग, आणि कोणाशी तरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग
* काय आहे हिंदुत्त्व, अरे 18 पगड जातीच्या लोकांनी एकमेकांना करु करुन मारलेल्या मिठीत आहे हिंदुत्व
* आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही राखली, तर दुसरे कोणी येऊन ती उतरवतील
* सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पडेगा, किसी एक फॅमिली का कुत्ता नही
* नेता स्वत:च्या घरात घरात नाही, लोकांच्या दारातच शोभून दिसतो, म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातील नेते व्हा
* 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेलाय
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भाजपाला फक्त निवडणुकीतच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते, अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले?
आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा हातात घ्यायचीय, लोकांचे प्रश्न सोडवायचेत – Sharad Pawar
शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय? वंचित बहुजन आघाडीचा सवाल