राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा | ST Employee

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा | ST Employee

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना (ST Employee) एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे घेतला. यानिर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, एसटी महामंडळाचे (ST Employee) व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ६५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेचे ॲड. गुणरत्न सदावर्दे, हनुमंत ताठे, संदीप शिंदे, श्रीरंग बरगे आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार पडळकर यांनी आभार मानले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केली विदर्भ- मराठवाड्यातील अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी | Heavy Rain

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी केली विदर्भ- मराठवाड्यातील अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी | Heavy Rain

Next Post
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी, मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध | Ganeshotsav 2024

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी, मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध | Ganeshotsav 2024

Related Posts
CM Eknath Shinde - Deputy CM Devendra Fadnavis

मिळालेल्या खात्यांबाबत शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा

मुंबई – शिंदे गटाती काही मंत्री हे खात्याबाबत असमाधानी असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ग्रामीण भागाशी…
Read More
uddhav

‘बाळासाहेबांना दिलेलं वचन अजूनही अर्धवटच आहे, कारण मी मुख्यमंत्री बनेन असे म्हणालो नव्हतो’

Mumbai – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांची सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार…
Read More
वडील अंपायर, क्रिकेटर लेक पहिले वनडे शतक झळकावत बनली 'लकी गर्ल'

वडील अंपायर, क्रिकेटर लेक पहिले वनडे शतक झळकावत बनली ‘लकी गर्ल’

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर प्रतिका रावलने (Pratika Rawal) आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीने शानदार कामगिरी केली. तिने…
Read More