गवताच्या आगीत ७ वीजवाहिन्या जळाल्या; तळवडे, देहूगाव परिसरात वीजपुरवठा विस्कळीत

गवताच्या आगीत ७ वीजवाहिन्या जळाल्या; तळवडे, देहूगाव परिसरात वीजपुरवठा विस्कळीत

पुणे | तळवडे (Talwade Power Supply) येथे गवताच्या आगीत महावितरणच्या २२ केव्ही व ३३ केव्ही क्षमतेच्या तब्बल ७ वीजवाहिन्या जळाल्या. परिणामी तळवडे पाणीपुरवठा योजनेसह तळवडे एमआयडीसी व इंडस्ट्रीयल परिसरातील सुमारे ४५०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. २९) दुपारी ३.४५ सुमारास खंडित झाला. यातील सुमारे १८०० उद्योगांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर उर्वरित २७०० उद्योगांसह पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा रात्री १० वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणकडून दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरु आहे.

दरम्यान, या आगीमुळे देहूगाव, चिंचोली गावातील २५०० घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. मात्र पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळी ६ वाजेपर्यंत या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा (Talwade Power Supply) पूर्ववत करण्यात आला आहे. आगीमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा गेल्या २ महिन्यांतील हा नववा प्रकार आहे.

याबाबत माहिती अशी की, तळवडे येथील डोंगरावरील वाळलेल्या गवताला मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली. ही आग सर्वत्र पसरत गेली. डोंगराशेजारी असलेल्या एका ओढ्याच्या कडेपर्यंत ही आग आली. त्याच ठिकाणी असलेल्या महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या ४ आणि ३३ केव्ही क्षमतेच्या ३ वीजवाहिन्या या आगीत जळाल्या. त्यामुळे तळवडे एमआयडीसी, इंडस्ट्रीयल परिसर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे पाणीपुरवठा योजनेसह सुमारे ४५०० लघु व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या सर्व परिसराला नियमित वीजपुरवठा करणाऱ्या ४ आणि पर्यायी वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त असलेल्या ३ वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे वीजपुरवठ्याची पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र इतर पर्यायी व्यवस्थेतून सुमारे १८०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तासांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला.

भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी तीन कंत्राटदार व सहा जॉईंटर यांना पाचारण करून एकाचवेळी सर्व वीजवाहिन्यांचे दुरुस्ती काम सुरु केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे, सहायक अभियंता  ऋषिकेश बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन या कामाला वेग दिला. आज रात्री १० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर उर्वरित २७०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर हॅकिंगचा प्रयत्न

पहलगाम हल्ल्यातील सहा कुटुंबांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी

पुण्यात 50 हजार थेट तर, पाच लाख अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीचे ध्येय; अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्धार

Previous Post
फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने पहलगाम हल्ल्यात केले आहे  घृणास्पद असे कृत्य 

फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने पहलगाम हल्ल्यात केले आहे  घृणास्पद असे कृत्य 

Next Post
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

Related Posts
आश्चर्यच! चीनने बनवली मन वाचणारी मशीन, मनात काय चाललंय काही सेकंदात समजणार

आश्चर्यच! चीनने बनवली मन वाचणारी मशीन, मनात काय चाललंय काही सेकंदात समजणार

China Mind Reading Machine | तंत्रज्ञानाच्या जगात चीन खूप पुढे आहे आणि अमेरिका आणि जपानसारख्या देशांशी स्पर्धा करत…
Read More
Dr. Shripal Sabnis

राजकीय व्यवस्था बरबटल्याने खोक्याची संस्कृती वाढली – श्रीपाल सबनीस

पुणे : “ देशातील सर्वच राजकीय व्यवस्था बरबटलेली असल्याने राजकीय पक्ष हे खोक्याची संस्कृती बनलेले आहेत. यामुळे विकासाच्या…
Read More
Tukaram Mundhe

लोकाभिमुख आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था’ निर्मितीस प्राधान्य – मुंढे

पुणे – लोककेंद्रित आरोग्य सेवा, डेटा आधारित निर्णय घेणे आणि सक्षमकर्ता म्हणून माहिती तंत्रज्ञान चा वापर करून लोकाभिमुख…
Read More