दादा भुसे यांच्या तालुक्यात तब्बल 89 कोटींचा अनुदान वाटप घोटाळा

मालेगाव – महाविकास आघाडी सरकार घोटाळेसत्तेत आल्यापासून सातत्याने विविध घोटाळे होत असल्याचे आरोप होताना दिसून येत आहेत. यातच आता आणखी एक घोटाळा समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदार संघात अतिवृष्टी अनुदान वाटपात घोळ झाला असल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

TV9 माराताहीने दिलेल्या वृत्तानुसार, जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये मालेगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले होते. चक्क 217 टक्के म्हणजेच 259.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे तब्बल 1 लाख 3 हजार 67.78 हेक्टरवरील पीक पाण्यात बुडाले. यामुळे 1 लाख 14 हजार 801 शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हे पाहता सरकारने त्यांना पहिल्या टप्प्यात 40 कोटी 82 लाख 8 हजार 44 रुपयांचे अनुदान मंजूर केले. त्याचा 35 हजार 181 शेतकऱ्यांनी लाभ घेतला. दुसऱ्या टप्प्यातही 45 कोटी 88 लाख 78 हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले. त्याचा 39 हजार 981 शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

पंचनाम्यानुसार सरकारने अनुदान दिले. मात्र, या अनुदान वाटपाची माहिती समजताच ज्यांचे अतिवृष्टीमुळे खरे नुकसान झाले, असे शेतकरी पुरावे घेऊन प्रशासनाकडे धडकले. त्यामुळे या घोटाळ्याचे बिंग फुटले. मग या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा 26 कोटींची मागणी सरकारकडे करण्यात आली. मात्र, घोटाळ्याची चर्चा इतकी झाली की, सरकारने हा निधी मंजूर केला नाही, पण दुसरीकडे बोगस लाभार्थ्यांना तब्बल 89 कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे समोर येत आहे.