धुळ्यात 89 तलवारी, खंजीर जप्त; पोलिसांच्या कारवाईत चौघे गजाआड

 धुळे – राजस्थानातील चितोडगड ( Chitodgad ) येथून जालना ( Jalana ) येथे शस्त्रास्त्रे नेणाऱ्या चौघांना मुंबई आग्रा महामार्गावर ( Mumbai Agra Highway ) गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांनी ( Songir Police ) बुधवारी सकाळी ७ वाजता पाठलाग करून पकडले. त्यांच्या वाहनातून तब्बल ८९ तलवारी आणि एक खंजीर जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जालना येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्याने महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट ( Conspiracy to cause riots in Maharashtra ) तर सुरू नाही ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सोनगीर पोलिस ठाण्याचे गस्ती पथक बुधवारी (ता.२७) सकाळी साडेसातला मुंबई- आग्रा महामार्गावर वाघाडी फाट्याजवळ होते. तेव्हा शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने जाणारी भरधाव स्कॉर्पिओ (एमएच ०९ सीएम ००१५) दिसली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्कॉर्पिओचा पाठलाग केला. वाहन थांबविण्याचा चालकाला इशारा दिला. मात्र, चालकाने प्रतिसाद दिला नाही.

पुढे मग  सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी सोनगीर फाट्याजवळ स्कॉर्पिओला ओव्हरटेक करून थांबविले. त्यात चौघे जण होते. विचारपूस करताना चौघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. स्कॉर्पिओची तपासणी केली असता तीत तब्बल ८९ तलवारी आणि खंजीर आढळला. पोलिसांनी वाहनासह सात लाख १३ हजार ६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहम्मद शरीफ, मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतिफ, सय्यद रहिम आणि कपिल विष्णू दाभाडे या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १८४, २३९, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.