जिल्हाधिकारी दिवसे यांच्या कार्यतत्परतेमुळे पिंपळे जगताप येथील १०६ वर्षाच्या आजींनी मतदान केंद्रावर जावून केले मतदान

जिल्हाधिकारी दिवसे यांच्या कार्यतत्परतेमुळे पिंपळे जगताप येथील १०६ वर्षाच्या आजींनी मतदान केंद्रावर जावून केले मतदान

Pune Loksabha Voting: जिल्ह्यात पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असून यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, गर्भवती महिला, तृतीयपंथीय, नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांची मतदानाप्रती असलेली जागरुता कमालीची असून त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन मतदान केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांकरीता असलेल्या सुविधांमुळे त्यांना सुलभरित्या मतदान करता आले.

शिरुर विधानसभा मतदारसंघात पिंपळे जगताप केंद्रावर रखमाबाई दत्तोबा शेळके या १०६ वर्ष वयाच्या, अनुसया काशिनाथ सोंडेकर या १०५ वर्ष वयाच्या आजींनी टपाली मतदानाचा पर्याय न स्वीकारता मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९८ वर्षाच्या विमला दत्तात्रय शिंगणे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ९८ वर्षाच्या लक्ष्मीबाई गराडे, ९० वर्षाच्या कलावती कांबळे यांनी मतदान केंद्रावर जावून मतदानांचा हक्क बजावला. तरुण मतदारांना लाजवेल अशी इच्छाशक्ती त्यांच्या अंगी दिसून आली.

शालू राठोड ह्या प्रसुतीकरीता त्यांच्या माहेरी चाकण येथे गेल्या होत्या. त्यांचे नाव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत असल्याने त्यांनी प्रसुतीची तारीख १४ मे असतानादेखील रुग्णालयात जाण्यापूर्वी मतदान करण्याची प्रशासनाकडे इच्छा व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या सुचनेनुसार उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी सदर महिलेला चाकण येथून शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथील मतदान केंद्रावर आणण्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. श्रीमती राठोड यांनी दुपारी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात त्या प्रसूतीसाठी दाखल झाल्या.

ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी केली होती. जिल्ह्यातील तिन्ही मतदार केंद्रात हेच चित्र पहायला मिळाले. काही ज्येष्ठ व्यक्ती आपल्या प्रथम मतदान करणाऱ्या नातवंडांसह तर काही आपल्या वयोवृद्ध मित्रांसह मतदानाला आले. काही ठिकाणी प्रशासनातर्फे नेमलेल्या स्वयंसेवकांनी या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्यासाठी व्हीलचेअरचीदेखील व्यवस्था केली होती. मतदान केंद्रावरील सुविधांबाबत या मतदारांनी समाधान व्यक्त केले.

पुणे कॅन्टोंनमेन्ट विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांच्या चेहऱ्यावर मतदान केल्यानंतर समाधानाची भावना दिसून आली. भारत निवडणुक आयोगाच्यावतीने ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाच्यावेळी सहकार्य केल्याबाबत त्यांनी आभार मानले. मतदान आपला हक्क आहे, एक राष्ट्रीय कर्तव्य समजून नवमतदारांनी मतदान केले पाहिजे, अशा प्रतिक्रिया यावेळी मतदारांनी व्यक्त केल्या.

“रखमाबाई, अनुसया आजी, शालू राठोड, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले मात्र मतदानासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येत असलेले तरुण, दिव्यांग नागरिक हे आपले मतदानाचे प्रेरणादूतच आहेत. अशा मतदारांकडून प्रेरणा घेऊन समाजातील सर्व पात्र मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान करायला हवे”, असे आवाहनही याप्रसंगी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
NCP expresses gratitude for peaceful polling

NCP expresses gratitude for peaceful polling

Next Post
Eknath Shinde | पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना लाज वाटायला हवी, शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

Eknath Shinde | पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना लाज वाटायला हवी, शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

Related Posts
Ramdas_Athavle

महाविकास आघाडीच्या नादी लागल्यामुळे उद्धव ठाकरेंवर धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली- रामदास आठवले

मुंबई – एक कविता सादर करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी महाविकास…
Read More
Pune News | बारामतीकर विक्रम काळे यांचं सेट परीक्षेत यश...!

Pune विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करणारे बारामतीकर विक्रम काळे यांचं सेट परीक्षेत यश…!

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) जयकर ग्रंथालयात अभ्यास करणारे बारामतीचे सुपुत्र विक्रम…
Read More
भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

Vijay Vadettiwar : छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र, अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या…
Read More