SL Vs Ban Match | बुधवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका क्रिकेट संघाने बांगलादेशचा ७७ धावांनी पराभव केला. आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ६ फूट लांबीचा साप मैदानात घुसल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी खेळाडू खेळत होते, पण सापाला पाहून सर्वजण थांबले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( SL Vs Ban Match) घेतला. खराब सुरुवातीनंतर कुसल मेंडिस (४५) ने चांगली खेळी केली, कर्णधार चारिथ अस्लंकाने शानदार शतक झळकावले. त्याने १०६ धावांच्या त्याच्या खेळीत ४ षटकार आणि ६ चौकार मारले. प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाने २४४ धावा केल्या.
साप मैदानात घुसला
बांगलादेशच्या डावाच्या तिसऱ्या षटकात हा साप मैदानात घुसला, जो कॅमेऱ्याने कैद केला. जमिनीवर रेंगाळणारा हा साप वेगाने खेळपट्टीकडे जात होता, त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. यापूर्वीही श्रीलंकेत अशाच प्रकारचा साप मैदानात घुसला होता. काही दिवसांपूर्वी एका सामन्यादरम्यान, एका सापाचा मोहक अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला होता.
#snake #Cricket pic.twitter.com/Y5KMfE94aZ
— ABHISHEK PANDEY (@anupandey29) July 3, 2025
चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशचा पराभव झाला
२४५ धावांचा पाठलाग करताना, बांगलादेश क्रिकेट संघाची सुरुवात चांगली झाली. तन्जीद हसन (६२) आणि नझमुल हुसेन शांतो (२३) यांच्या नियंत्रित खेळीमुळे बांगलादेशने १ विकेट गमावून १०० धावा केल्या. पण नझमुल धावबाद झाल्यानंतर संपूर्ण संघ कोसळला. १०० धावांवर फक्त १ विकेट होती, तिथे १२५/९ अशी धावसंख्या झाली. शेवटी, अलीने काही काळ संघर्ष केला आणि अर्धशतकी खेळी (५१) खेळली, पण ती पुरेशी नव्हती.
श्रीलंका क्रिकेट संघाने पहिला एकदिवसीय सामना ७७ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना शनिवार, ५ जुलै रोजी खेळला जाईल. मालिकेचा शेवटचा सामना ८ जुलै रोजी खेळला जाईल.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
राज ठाकरे पुन्हा शिवसेनेत आले, तर तेच पक्षाचे प्रमुख ठरतील – Narayan Rane
दुष्काळाला भूतकाळ बनवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपा समर्पित – Devendra Fadnavis
“मुख्यमंत्र्यांना सुदबुद्धी दे!” – महाविकास आघाडी विठ्ठलाला घालणार साकडं