महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर दिवाळीच्या दिवशी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. भाजपने रवी राजा यांना मुंबईचे उपाध्यक्ष केले आहे.
काँग्रेसचे आणखी बडे नेते भाजपमध्ये येणार – देवेंद्र फडणवीस
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी काळात काँग्रेसचे मोठे अनुभवी नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आता नाव विचारू नका, वेळ आल्यावर नाव कळेल. रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) खूप फायदा होईल.
माहीमच्या जागेबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “आम्ही माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी मार्ग शोधत आहोत. आम्हाला आशा आहे की यावर लवकरच तोडगा निघेल. राहिला प्रश्न उत्तर भारतीय लोकांमध्ये राज ठाकरेंना असलेल्या विरोधावर, त्यावर तोडगा निघेल, आम्ही आमचा पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट झाले.”दिवाळीत काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश
#WATCH | Mumbai: Former Congress leader and former LoP of Mumbai Municipal Corporation Ravi Raja joins BJP in the presence of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis. pic.twitter.com/pHy1KJuSZf
— ANI (@ANI) October 31, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या दिवशी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रवी राजा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. भाजपने रवी राजा यांना मुंबईचे उपाध्यक्ष केले आहे.
काँग्रेसचे आणखी बडे नेते भाजपमध्ये येणार – देवेंद्र फडणवीस
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी काळात काँग्रेसचे मोठे अनुभवी नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आता नाव विचारू नका, वेळ आल्यावर नाव कळेल. रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विधानसभा निवडणुकीत खूप फायदा होईल.
माहीमच्या जागेबाबतही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “आम्ही माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी मार्ग शोधत आहोत. आम्हाला आशा आहे की यावर लवकरच तोडगा निघेल. राहिला प्रश्न उत्तर भारतीय लोकांमध्ये राज ठाकरेंना असलेल्या विरोधावर, त्यावर तोडगा निघेल, आम्ही आमचा पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट झाले.”
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“कोथरूडकरांचे आरोग्यदूत: चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य सेवा मजबूत” | Chandrakant Patil
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली, ‘या’ जागांवर मविआत मैत्रीपूर्ण लढत
रिपब्लिकन पक्ष महायुतीचा प्रचार करणार, पुण्यातील पदाधिकाऱ्यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती