टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल, अंबानी बनले 9वे सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठा बदल झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मोठा नफा झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या अब्जाधीशांच्या यादीत अंबानींनी झेप घेतली आहे. सर्जी ब्रिनला मागे टाकत अंबानी जगातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.(A big change in the top-10 billionaires list, Ambani becomes the 9th richest person)

फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, त्यांची एकूण संपत्ती $96.2 अब्ज आहे. त्याच वेळी, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी हे जगातील 11 व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती $93.8 अब्ज आहे.

यादीनुसार, भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी अजूनही चौथ्या क्रमांकावर कायम आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी $ 138.1 अब्ज संपत्तीचे मालक आहेत, तर ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानी समूहाचे गौतम अदानी $ 135 अब्ज संपत्तीचे मालक आहेत.