परळी दौऱ्यावर असलेल्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना आज आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिरसाळा गावात त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलकांनी सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर परळी बदनाम करत असल्याचा आरोप केला. लोकशाही मार्गाने निषेध करण्याचा अधिकार आहे, मात्र काहींनी पोलिसांसमोर दगड उचलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धस यांनी केला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल करत, परळीतील गुंडगिरी आणि दहशत संपवण्यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचे सांगितले. दरम्यान, गाळेधारक आणि बेकायदेशीर वीटभट्टी व्यावसायिक निषेध करत असल्याचा आरोपही धस यांनी केला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मनसे नेत्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न? राज ठाकरे संतापले!
शरद पवारांचं राजकारणातलं स्टेटस मोदींपेक्षा मोठं, पंतप्रधानांच्या त्या कृतीनंतर राऊतांची प्रतिक्रिया
आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार? भगव्या स्टेटसने राजकीय चर्चांना उधाण