पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांच्यावर एका नागरिकाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शनिवारी (ता. 25) चांदेरे यांनी विजय रौंदळ या नागरिकाला जमिनीच्या वादावरून मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत चांदेरे विजय रौंदळ यांना चापट मारत उचलून आदळताना दिसत आहेत. या मारहाणीमुळे विजय यांना डोक्याला आणि गुडघ्याला जखम झाल्या आहेत. या घटनेनंतर बावधन पोलिस ठाण्यात बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबुराव चांदेरे हे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. याआधी देखील चांदेरे यांच्या विरोधात अशा प्रकारची एक मारहाणीची घटना समोर आली होती, ज्यात त्यांनी रिक्षा चालकाला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली असून पुढील तपास सुरु आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली, पुढील ४ दिवसांचे सर्व दौरे रद्द
राष्ट्रपती मुर्मू ९४२ कर्मचाऱ्यांना पोलिसांना पदकांनी सन्मानित करतील, ज्यात ९५ शौर्य पदकांचा समावेश
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्या; Supriya Sule यांची मागणी