कोण असेल सनरायझर्स हैदराबादच्या कॅप्टन्सीचा दावेदार? लिलावात ‘या’ खेळाडूंवर असेल फ्रँचायझीची नजर

IPL Auction: आयपीएल २०२३चा मिनी लिलाव सुरू होण्यासाठी अवघे काही तासच उरले आहेत. केरळच्या कोची येथे ४०५ खेळाडूंसाठी हा लिलाव होणार आहे. यांपैकी केवळ ८७ खेळाडूंची निवड १० फ्रँचायझींद्वारे केली जाईल, त्यामुळे लिलाव पाहायला मजा येणार हे निश्चित आहे. या लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने त्यांचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याला रिलीज केले आहे. त्यामुळे लिलावात त्याच्या नावावरही बोली लागताना दिसेल.

न्यूझीलंडचा विश्वविजेता कर्णधार सनरायझर्स संघाकडून चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्याच्या वैयक्तिक प्रदर्शनाबरोबरच नेतृत्त्वातील कामगिरीही सरासरी राहिली होती. त्यामुळे हैदराबाद संघाने विलियम्सनला संघमुक्त करत नवा कर्णधार शोधण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे लिलावात हैदराबादचा संघ अनुभवी आणि प्रतिभाशाली खेळाडूला आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी प्रयत्नशील असतील, जो संघाचे नेतृत्त्वपदही सांभाळू शकेल.

लिलावात सनरायझर्सचा संघ इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला (Sunrisers Hyderabad New Captain) विकत घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. स्टोक्सला क्रिकेटचा ११ वर्षांचा अनुभव आहे. याबरोबरच आयपीएलमध्येही त्याने ४३ सामने खेळले आहेत. तो सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाची कमान सांंभाळतोय. अशात ३१ वर्षीय स्टोक्स सनरायझर्ससाठी कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार असू शकतो. त्याच्याव्यतिरिक्त कॅमेरून ग्रीन आणि जो रूटवरही सनरायझर्स संघाची नजर असेल. सनरायझर्सने आतापर्यंत फक्त एकदा (२०१६ साली) आयपीएल चषक जिंकला आहे.

आता लिलावात सनरायझर्सचा संघ कोणत्या खेळाडूवर मोठी बोली लावत त्याला संघनायक बनवतो?, याकडे सर्वांची नजर असेल.