डॉक्टर असणारा कृणाल बनला पुणे टू गोवा चित्रपटाचा सहायक दिग्दर्शक

पुणे: मराठीतले अनेक कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये चमकत आहेत. यात नव्या फळीतल्या कलाकारांनाही संधींची दारं खुली झाली आहेत. डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा ह्याला ‘पुणे टू गोवा’ या हिंदी चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून अमोल भगत चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहेत. फॅन्ड्री फेम राजेश्वरी खरात बरोबरच आदित्यराजे मराठे देखील या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

आजवर मराठीतले अनेक बडे कलाकार बॉलिवूडपटात चमकले. याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं दिसतं. विशेष म्हणजे या कलाकारांचा अभिनय हिंदीच्या मोठ्या पडद्यावर करताना पाहायला मिळणार आहे. गोरेगाव – रायगड येथील रहिवासी असणारा कृणाल याने  पुण्यातील भारती विद्यापीठ मधून नुकतंच आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल आहे. तसेच त्याने अनेक चित्रपटात छोटे मोठे कामं केले आहे . मेथा याला बॉलिवूडचे तिकीट मिळालं आहे.

पुणे टू गोवा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स थ्रिलर आणि अॅक्शनने पुरेपूर भरलेला आहे. चित्रपटाची कथा वास्तविक आयुष्यात संघर्ष करणाऱ्या कलाकारांच्या प्रवासावर आधारित आहे. कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणाऱ्या धोकादायक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे, अशी माहिती अमोल भगत यांनी दिली. चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस करीत आहेत.या चित्रपटात सुनिल पाल, एहसान कुरेशी या सारखे दिग्गज कलाकार काम करत असून चित्रपटातील गाणी जावेद अली शाहिद मल्ल्या, केतकी माटेगावकर यांनी गायलेली आहेत.चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.