साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन

प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते केपी चौधरी यांनी आत्महत्या (KP Chaudhary suicide) केली आहे. २ वर्षांपूर्वी त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. गोवा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या तपासात असे समजत आहे की प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते के पी चौधरी ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्थिक संकट आणि कामाच्या अभावामुळे नैराश्याने ग्रस्त होते.

याआधी २०२३ मध्ये, त्यांना हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. केपी चौधरी (KP Chaudhary suicide)यांनी रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाची निर्मितीही केली. या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे.

चित्रपट निर्माते आर्थिक संकटाचा सामना करत होते
केपी चौधरी म्हणजेच शंकरा कृष्ण प्रसाद चौधरी हे टॉलीवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. त्यांनी २०१६ मध्ये रजनीकांतचा सुपरहिट चित्रपट ‘कबाली’ ची निर्मिती केली. २०२३ मध्ये, केपी चौधरी यांना सायबराबाद स्पेशल ऑपरेशन्स टीमने ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक केली होती.

चौकशी केल्यावर असे आढळून आले की त्याचे क्लायंट केवळ टॉलीवूडमध्येच नाही तर कॉलीवूडमध्येही होते. सुरुवातीच्या अहवालांमधून आता असे दिसून आले आहे की या प्रकरणानंतर, तो आर्थिक अडचणींचा सामना करत होता आणि त्याच्या कर्जदारांकडून त्याच्यावर दबाव होता. चित्रपट उद्योगात अपयश आल्यानंतर, तो ड्रग्ज मिळवणे आणि वाटणे यासारख्या कामांमध्ये सामील झाला असा आरोप आहे.

डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, त्याने गोव्यात ओएचएम पब देखील उघडला होता जिथून तो प्रसिद्ध सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत असे.

केपी चौधरी यांनी रजनीकांतच्या चित्रपटात पैसे गुंतवले होते
२०१६ मध्ये, रजनीकांतचा सुपरहिट चित्रपट ‘कबाली’ प्रदर्शित झाला, ज्याची निर्मिती केपी चौधरी यांनी केली होती. इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, चित्रपटाने तेव्हा जगभरात ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. आणि त्या वर्षी तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत तो अव्वल स्थानावर होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला

आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करा- Rupali Chakankar

नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं अन् माजी सभापतीला निर्दयीपणे संपवलं

Previous Post
टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मासोबत डेटिंगची चर्चा; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मासोबत डेटिंगची चर्चा; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

Next Post
"दिग्दर्शकानं रात्री हॉटेलमध्ये बोलावलं अन्..."; प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा अनुभव

“दिग्दर्शकानं रात्री हॉटेलमध्ये बोलावलं अन्…”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा हादरवणारा अनुभव

Related Posts
शमीच्या सात विकेट! न्यूझीलंडला हरवत भारत चौथ्यांदा पोहोचला वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात

शमीच्या सात विकेट! न्यूझीलंडला हरवत भारत चौथ्यांदा पोहोचला वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात

IND vs NZ Semi Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वनडे विश्वचषक २०२३चा पहला उपांत्य सामना…
Read More
Loksabha Election Results | मणीपुरात कोण जिंकलं? पहा राजकीय पक्षांची राज्यनिहाय स्थिती काय ?

Loksabha Election Results | मणीपुरात कोण जिंकलं? पहा राजकीय पक्षांची राज्यनिहाय स्थिती काय ?

Loksabha Election Results | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशातील लोकसभेच्या एकंदर 543 जागांपैकी भारतीय…
Read More
'या' करोडपती कुटुंबाने आपली अफाट संपत्ती सोडली, विलासी जीवनाचा त्याग केला आणि साधू बनले

‘या’ करोडपती कुटुंबाने आपली अफाट संपत्ती सोडली, विलासी जीवनाचा त्याग केला आणि साधू बनले

गुजरातमधील सर्वात यशस्वी हिरे व्यापाऱ्यांपैकी एक असलेल्या दीपेश शाह (Deepesh Shah) यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे आणि ते अतिशय…
Read More