Southern actor | एकाला संपवल्या प्रकरणी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला अटक, सिनेइंडस्ट्रीत खळबळ

Southern actor | एकाला संपवल्या प्रकरणी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला अटक, सिनेइंडस्ट्रीत खळबळ

Darshan Thoogudeepa Detained | प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याला (Southern actor) बेंगळुरू पोलिसांनी हत्येप्रकरणी कथितपणे ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसांनी म्हैसूर येथून ताब्यात घेतले असून आता त्याला बेंगळुरूला आणण्यात आले आहे. एका खून प्रकरणात एका आरोपीने दर्शनचे नाव उघड केले असून त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दर्शन हा आरोपीच्या सतत संपर्कात होता, असा आरोप आहे.

काय प्रकरण आहे?
TOI च्या रिपोर्टनुसार, बेंगळुरू शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा (Southern actor) आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांना एका हत्येप्रकरणी ताब्यात घेतले, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रदुर्गातील रेणुकास्वामी नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. स्वामी हे चित्रदुर्गातील एका मेडिकल दुकानात असिस्टंट होते आणि नुकतेच लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे प्रथम चित्रदुर्ग येथून अपहरण करून शहराच्या पश्चिम भागातील कामाक्षीपल्य येथे हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह नाल्यातून सापडला असून त्यावर शारिरीक जखमांच्या खुणा होत्या, त्यामुळे हे हत्याकांड असल्याची पुष्टी झाली.

बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, “कन्नड अभिनेता दर्शन आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. अद्याप तपास सुरू असल्याने आम्ही जास्त माहिती देऊ शकत नाही,” सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Sonakshi Sinha | लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांना कल्पना नाही; म्हणाले, "आजकालची मुलं..."

Sonakshi Sinha | लेकीच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांना कल्पना नाही; म्हणाले, “आजकालची मुलं…”

Next Post
BAN vs SA ICC Rule | आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशचा घात; पंचांनी चौकार नाकारला अन् 4 धावांनीच पराभव झाला!

BAN vs SA ICC Rule | आयसीसीच्या नियमामुळे बांगलादेशचा घात; पंचांनी चौकार नाकारला अन् 4 धावांनीच पराभव झाला!

Related Posts

भारत जोडो यात्रा : शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहताना वाजले फटाके, राहुल गांधीही संतापले

Buldhana – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान, ही…
Read More

जितेंद्र आव्हाडांनी उचललं टोकाचं पाऊल; आमदारकीचा राजीनामा जयंत पाटलांकडे सोपविला

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर रिदा रशीद नामक महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे. यानंतर पोलिसांनी…
Read More

रामदास आठवलेंच्या नेतृत्वात बौद्धांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची उद्या भेट घेणार

मुंबई – राष्ट्रपती महामहिम रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची नवि दिल्लीत राष्ट्रपती भवनात (President House) उद्या दि.30…
Read More