दौंड : प्रेम संबंधातून युवतीवर जीवघेणा हल्ला; अल्पवयीन युवती गंभीर जखमी

दौंड/ सचिन आव्हाड – दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे पुणे सोलापुर महामार्गावर मळद तलावाच्या समोरील शेतात साडे अकराच्या सुमारास सतरा वर्ष अल्पवयीन मुलीचा गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill a minor girl by slitting her throat) करण्यात आला आहे. आरोपी राहुल श्रीशैल निरजे (Accused Rahul Srishail Nirje) (वय २७)राहणार खटाव,जि. सांगली,सध्या राहणार पुणे  याला स्थानीक नागरिकांच्या सतर्कतेने ताब्यात घेण्यात आले असून गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या युवतीला दौंड येथील पिरॅमिड या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आरोपी युवक राहुल निरजे हा पिरंगुट येथील कुकरच्या हँडल बनवणाऱ्या खाजगी कंपनीत काम करीत होता. युवती ही त्याची नातेवाईक असून त्यांच्या मध्ये प्रेम संबंध असल्याची माहीती युवकाने दिली आहे. सकाळी युवतीला एम एच १० डी २७१० ह्या दुचाकीवरून हडपसर येथील गाडीतळावरून घेऊन सोलापूरच्या दिशेने जात असताना कुरकुंभ च्या चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मळद तलावाच्या समोरील निर्जन उसाच्या शेतात घेऊन जाताना काही ग्रामस्थांनी पाहीले. त्यानंतर काही वेळात आरोपीला पळताना पाहून ग्रामस्थांनी तत्परता दाखवत आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले तर रुग्णवाहिकेच्या मदतीने युवतीला तात्काळ दौंड येथील पिरॅमिड रुग्णालयात (पिरॅमिड रुग्णालय) दाखल करण्यात आले आहे.

सदर घटना ही प्रेम संबंधातून झाली असल्याची प्राथमीक माहीती मिळत असुन आरोपी युवकाने दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या घरच्यांनी आपल्याला मागील दोन वर्षांपासून लग्नासाठी ताटकळत ठेऊन आता काहीच प्रतीसाद मिळत नसल्याच्या कारणास्तव हे पाऊल उचलले असल्याचे सांगीतले आहे.

दरम्यान घटनेची माहीती मिळताच कुरकुंभचे सरपंच आयुब शेख, माजी उपसरपंच सुनील पवार, पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे (Sarpanch Ayub Sheikh, former Deputy Sarpanch Sunil Pawar, Police Constable Shrirang Shinde), अभिजीत शितोळे (Abhijeet Shitole) व स्थानीक नागरीकांनी घटनास्थळी जाऊन तत्परतेने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमी युवतीस रुग्णालयात दाखल केले. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.