प्रेयसीला मेसेज केल्याने मित्राने घेतला मित्राचा जीव, गळा चिरला, बोटे कापली आणि मग…

हैदराबादमध्ये (Hyderabad) मैत्रिणीला मेसेज करून कॉल करत असल्याच्या कारणावरून एका मित्राने त्याच्या एका मित्राची हत्या (Murder) केली. यामुळे आरोपी इतका संतापला की त्याने आपल्या मित्राचा शिरच्छेद केला, त्याचे हृदय आणि गुप्तांग काढले आणि त्याची बोटेही कापली आणि नंतर स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीच्या जबाबावरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आणि हरिहर कृष्णा यांनी दिलसुखनगर कॉलेजमध्ये इंटरमिजिएटचे शिक्षण एकत्र पूर्ण केले होते. ते दोघे चांगले मित्र होते. घटनेच्या केंद्रस्थानी असलेली मुलगीही याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. दोघेही मुलीच्या प्रेमात पडले. प्रथम नवीनने तरुणीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि दोघेही रिलेशनशिपमध्ये होते मात्र, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

त्यानंतर हरिहर कृष्णाने मुलीवर प्रेम व्यक्त केले आणि मुलीने ते स्वीकारले. ब्रेकअप होऊनही नवीन सतत मुलीच्या संपर्कात होता आणि तिला मेसेजिंग आणि कॉल करत होता, ज्यामुळे कृष्णा खूप अस्वस्थ झाला. आरोपी तीन महिन्यांहून अधिक काळ संधीची वाट पाहत होता. पोलिसांनी सांगितले की, 17 फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत दोघांमध्ये भांडण झाले आणि कृष्णाने नवीनचा गळा दाबून खून केला.

मिळालेल्या माहितीनुसार,  हरिहर कृष्णाने प्रथम नवीनचा गळा दाबून खून केला आणि नंतर त्याच्या शरीराचे तुकडे केले. हरिहरने त्याचा गळा चिरला, हृदय बाहेर काढले आणि बोटेही कापली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आता हे कृत्य केल्यानंतर त्याने नवीनचे फोटो तरुणीला व्हॉट्सअॅपवर पाठवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जनसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.