Amit Shah | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करून लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांच्या क्रांतिकारी विचारांना उजाळ देऊन अमित शहा पुढे म्हणाले, युद्ध नियम कालबाह्य नसतात. व्यूहरचना, त्वरा, समर्पणभाव, देशभक्ती, बलिदानाची वृत्ती योद्ध्याला नेहमीच प्रेरित करते आणि यश देते. या सर्वांचा संगम असलेले श्रीमंत बाजीराव पेशवे हे एकमेव लढवय्ये होत. त्यामुळे अवघ्या 19व्या वर्षी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पुढील 20 वर्षात 41 लढाया लढूनही पेशवे एकही लढाई हरले नाहीत. ते पुढे म्हणाले, संरक्षण दलांमधील तीनही विभागांचे प्रशिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दिले जाते. या संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा कायम प्रेरणा देईल. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या युद्धनितीच्या कौशल्यातून देशाच्या सीमा भविष्याही सुरक्षित राहतील. छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शौर्य वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. मला निराशा आली तर बाल शिवाजी, श्रीमंत बाजीराव पेशवे या वीर योद्ध्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आठवतो आणि माझी निराशा नाहीशी होते.
देशासाठी समर्पण, बलिदान देणाऱ्या अनेक योद्ध्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडला गेला तसेच पुसलाही गेला. विकास आणि विरासत या पंतप्रधान मोदी यांच्या सूत्रातून प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा, वीर योद्ध्यांचा खरा इतिहास जगासमोर यावा यासाठी हा इतिहास भावानुवादीत होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही अमित शहा (Amit Shah) यांनी दिली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
आदित्य ठाकरेंनी खोटी माहिती दिली; दिशा सालियन प्रकरणात नितेश राणेंचा निशाणा
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी- Ajit Pawar
आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा, दिशा सालियन प्रकरणात क्लीन चिट | Disha salian