Navi Mumbai News | वाशी ते सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यानच्या सर्व्हिस रोडवर एका इनोव्हा कारच्या डिक्कीतून हात लटकताना दिसल्याने परिसरात खळबळ उडाली होती. काही वेळासाठी ही घटना खून, अपहरण किंवा गंभीर गुन्ह्याची शंका निर्माण करणारी ठरली होती. मात्र, तपासादरम्यान समोर आलेल्या सत्याने साऱ्यांनाच धक्का बसला.
पोलिसांनी गाडीचा शोध घेऊन ( Navi Mumbai) संबंधित तरुणांना ताब्यात घेतलं असता हा प्रकार केवळ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रीलसाठी केल्याचं निष्पन्न झालं. डिक्कीत हात लटकवत केलेला व्हिडिओ मुलांनी पोलिसांना दाखवला आणि रील बनवण्यासाठी डिकीत बसल्याचंही कबूल केलं.
पोलिसांनी संबंधित तरुणांविरोधात चौकशी सुरू केली असून, समाजात भीती निर्माण करणं, अपप्रचार करणं व सार्वजनिक शांतता भंग करणं अशा आघाड्यांवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. ‘वायरल होण्यासाठी केलेली कृती समाजात घबराट निर्माण करू शकते’, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
ही घटना अति उत्साही सोशल मीडिया ट्रेंडच्या नकारात्मक परिणामाचं उदाहरण ठरत असून, अशा प्रकारच्या कृती टाळाव्यात असं आवाहनही प्रशासनाने केलं आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मेहुल चोक्सीच्या अटकेवर खासदार सुप्रिया सुळे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया
पश्चिम बंगाल वक्फ कायदा विरोधातील हिंसाचार प्रकरणात अटक संख्या 150 वर
पुढे कोणतीही तनिषा भिसेसारखी घटना घडू नये यासाठी पावले उचलणार – Rupali Chakankar