Ramdas Athawale | रामदास आठवलेंच्या घरी आला नवा पाहुणा, दत्तक घेतला बिबळ्या वाघ पँथर

Ramdas Athawale | मुंबईत संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये कान्हेरी गुंफा या बौध्द लेणी असून हा जागतिक वारसा आहे.या कान्हेरी गुंफा युनो द्वारे जागतिक वारसा आणि जागतिक संरक्षित स्थळ म्हणून युनो च्या संरक्षित स्थळांच्या जागतिक नकाशात नोंद व्हावी; कान्हेरी गुंफा या जागतिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित कराव्यात त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज सांगितले.

त्यांनी मुंबईत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी दत्तक योजनेत बिबळ्या वाघ पँथर दत्तक घेतला. मागील 6 वर्षांपासून रामदास आठवले आणि त्यांचा सुपुत्र जित आठवले हे बिबळ्या वाघ पँथर दत्तक घेत आहेत. बिबळ्या वाघ दत्तक घेण्यासाठी त्याचा वर्षभराचा खर्च 1 लाख 20 हजार रामदास आठवलेंनी वनविभागाला सुपूर्द केला.

रामदास आठवलेंनी दत्तक घेतलेल्या बिबळ्या वाघ पँथरचे नाव सिंबा ठेवण्यात आले आहे. त्याला रामदास आठवलेंनी सींबा थांब अशी हाक मारताच पँथर सिम्बा त्यांचे पुढे थांबला.हे पाहून उपस्थितांना ही आश्चर्य वाटले. रामदास आठवले हे दलित पँथर चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत. पँथर आहेत. पँथर रामदास आठवलेंची भाषा पँथर सिंबाला लगेच कळली असे उपस्थितांनी कौतुकाने म्हंटले.

प्राणीमात्रांवर प्रेम करा ; प्राण्यांचे रक्षण करा; निसर्गावर प्रेम करा प्राण्यांवर प्रेम करा ; असा संदेश देण्यासाठी आपण दरवर्षी पँथर दत्तक घेतो.मी दलित पँथर चळवळीतून पुढे आलो आहे त्यामुळे मला पँथर बद्दल प्रेम आहे
पँथर स्वतः होऊन कुणावर हल्ला करीत नाही
पण कोणी हल्ला केला तर सोडत नाही थेट नरडीचा घोट घेतो, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

यावेळी वनविभागाचे वन संचालक एस. मल्लिकार्जुन;उपसंचालक रेवती कुलकर्णी; सौ.सीमाताई आठवले आणि रामदास आठवले यांचे बंधू संतोष आठवले व सर्व आठवले कुटुंबीय उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकबापू गायकवाड;उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड; दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावले; जतिन भुटटा ; माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी हरिहर यादव ; अमित तांबे; सचिन कासारे; अभया ताई सोनवणे; उषाताई रामळू; सोना कांबळे; अशोक कांबळे; सुनील गमरे जगदीश झालटे; रवींद्र पाशी; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CM Shinde | आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक

Prakash Ambedkar | ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळेच असले पाहिजे, आंबेडकरांनी स्पष्ट केली वंचितची भूमिका

Nana Patole | आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही

You May Also Like