Mazi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत नोंदणीचा नवा विक्रम. अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल

Mazi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत नोंदणीचा नवा विक्रम. अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाख अर्ज दाखल

राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ला (Mazi Ladki Bahin Yojana ) संपूर्ण राज्यातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. योजनेची नोंदणी सुरु झाल्यापासून अवघ्या २५ दिवसांत १ कोटी ८० लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. लवकरच २ कोटींचा टप्पा गाठेल, अशी माहिती शिवसेना उपनेते, प्रवक्ते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी दिली. आज बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ (Mazi Ladki Bahin Yojana )बाबत निरुपम पुढे म्हणाले की, नारीशक्ती दूत या ॲपमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे. या ॲपमधून दररोज ७ ते ८ लाख अर्ज सादर होत आहेत. त्याशिवाय नारीशक्ती दूत या ॲप्लिकेशन्सचे ८८ लाख डाऊनलोड्स झाले आहेत. प्रत्येक मिनिटाला या ॲपचे ८०० डाऊनलोड्स होत आहेत. सगळ्यात जास्त डाउनलोड होणाऱ्या ॲपमध्ये नारीशक्ती दूत ॲप देशात २७ व्या क्रमांकावर आहे. या ॲपमधून प्रत्येक मिनिटाला ६५० अर्ज सादर केले जात आहेत. इतका प्रचंड प्रतिसाद या आधी कोणत्याही योजनेला मिळालेला नाही, असा दावा निरुपम यांनी केला. या योजनेला मिळणारा तुफान प्रतिसाद हे राज्यातील माता भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती आहे, असे निरुपम म्हणाले.

ते म्हणाले की, आतापर्यंत १ कोटी ३० लाख ऑनलाईन ॲप्लिकेशन्स सरकारला प्राप्त झाले आहेत. ऑफलाइन पद्धतीने ५० लाख प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी राज्यातून किमान २ कोटी ते २.५ कोटी महिला पात्र ठरतील, असे सरकारने उदिद्ष्ट ठेवले आहे. येत्या ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत जे ॲप्लिकेशन येतील तेवढे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती निरुपम यांनी दिली. मुंबई आणि परिसरात नोंदणीसाठी शिवसेना पक्षाकडून २ ऑगस्ट २०२४ पासून प्रचार अभियान सुरु केले जाईल, असे निरुपम म्हणाले.

राज्यातून सर्वात जास्त नोंदणी पुणे जिल्ह्यातून झाली आहे. पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत ८ लाख ६३ हजार महिलांनी फॉर्म भरले आहेत. योजनेसाठी सरकारकडे पैसे नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांचा निरुपम यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, या योजनेसाठी राज्य सरकारने केंद्राकडे एकही रुपया मागितलेला नाही. ही राज्य सरकारची स्वतःची योजना आहे. काँग्रेससारखी खटाखट योजना नाही. मुख्यमंत्री शब्द पाळणारे आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’साठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अर्ज केलेल्या ज्या महिलांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल अशा कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट २०२४ रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये जमा होतील, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Maratha entrepreneur | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठा उद्योजक तयार करण्याचा संकल्प पूर्ण

Maratha entrepreneur | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठा उद्योजक तयार करण्याचा संकल्प पूर्ण

Next Post
Dhairyasheel Mane | शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

Dhairyasheel Mane | शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

Related Posts
लक्ष्मण हाकेंच्या त्या व्हिडिओवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "याचे करता करविते..."

लक्ष्मण हाकेंच्या त्या व्हिडिओवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “याचे करता करविते…”

Manoj Jarange | राज्यात मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात…
Read More
करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर नादालाही लागायचं नाही, Ajit Pawar यांचे लक्षवेधी विधान

करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर नादालाही लागायचं नाही, Ajit Pawar यांचे लक्षवेधी विधान

Baramati Rojgar Melava: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्याच्या (Namo Maharojgar Melava) निमित्ताने…
Read More
Supriya Sule | पुणेकरांवर भयानक संकट, कपडे आणि ब्लँकेटची मदत करा

Supriya Sule | पुणेकरांवर भयानक संकट, कपडे आणि ब्लँकेटची मदत करा

Supriya Sule | पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर आणि निंबजनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. अतिवृष्टी आणि पूरामुळे शेकडो…
Read More