Pune News | भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या आहुजाच्या घटनेनंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या आवारात तीन विद्यार्थिनींकडे बघून एका व्यक्तीने विकृत कृती केली. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर आंदोलन छेडले.
विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर जेवण करून त्या तिघी रिफेक्टरीहून मुलींच्या वसतिगृहाकडे जात होत्या. यावेळी मराठी भाषा विभागाबाहेर एका व्यक्तीने त्यांच्याकडे पाहून हस्तमैथुन करण्याचा घृणास्पद प्रकार केला. घटनेनंतर दोन विद्यार्थिनींनी त्या व्यक्तीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर एका विद्यार्थिनीने तातडीने सुरक्षारक्षकाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आरोपी पळून गेला.
या गंभीर प्रकाराबद्दल विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. पुणे विद्यापीठासारख्या (Pune News) प्रमुख शैक्षणिक संस्थेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी, मुख्यमंत्री व मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी’
मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद
शिवसैनिकांना कचरा समजणारे हाय व्होल्टेज शॉकमधून सावरले नाहीत; शिंदेंची उबाठावर खरमरीत टीका