अंबाजोगाईत वकिली करणाऱ्या तरुणीला सरपंच व कार्यकर्त्यांची अमानुषपणे मारहाण

अंबाजोगाईत वकिली करणाऱ्या तरुणीला सरपंच व कार्यकर्त्यांची अमानुषपणे मारहाण

Crime News |अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला गावातील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी 14 एप्रिल रोजी अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाईपने झालेल्या बेदम मारहाणीमुळे त्यांच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या असून, अंगात रक्तसाकळल्याची माहिती समोर आली आहे.

सनगाव गावातील ही घटना असून, ज्ञानेश्वरी यांच्यावर केवळ भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केल्यामुळे सूडबुद्धीनं हल्ला करण्यात आल्याचा (Crime News) आरोप त्यांनी केला आहे. त्या काळात अभ्यास करत असताना मंदीराच्या भोंग्याचा आवाज त्रासदायक ठरत होता, त्यामुळे त्यांनी सरपंच अनंत अंजान यांना आवाज कमी करण्यास सांगितलं होतं. मात्र, यानंतर सुरू झालेल्या वादातून अखेर मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचलं.

मारहाणीनंतर ज्ञानेश्वरी यांना मायग्रेन आणि पाठीच्या दुखण्याचा तीव्र त्रास सुरू झाला आहे. सरपंचाने त्रास देण्यासाठी मुद्दाम त्यांच्या घराशेजारी तीन पीठ गिरण्या सुरू केल्या आणि सततच्या आवाजामुळे त्यांचे आरोग्य बिघडले. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वयाच्या ६०व्या वर्षी पहिल्यांदाच लग्न करतोय ‘हा’ भाजप नेता, जाणून घ्या कोण त्यांची होणारी वधू

ईडी, सीबीआयच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही: रमेश चेन्नीथला

वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीचे स्वागत, नवीन कायदा रद्द करा

Previous Post
भारताची स्मार्टफोन निर्यात दोन लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर

भारताची स्मार्टफोन निर्यात दोन लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर

Next Post
‘एमपीएल’च्या तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज

‘एमपीएल’च्या तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज

Related Posts
मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणार - रमेश बागवे

मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणार – रमेश बागवे

Maratha Reservation – गेल्या कित्येक वर्षापासून मातंग समाज स्वतंत्र्य आरक्षणाची मागणी करीत आहे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास…
Read More
Pahalgam Terror Attack : युद्धासाठी तत्पर! केंद्राचे सर्व राज्यांना मॉक ड्रीलचे आदेश

Pahalgam Terror Attack : युद्धासाठी तत्पर! केंद्राचे सर्व राज्यांना मॉक ड्रीलचे आदेश

Pahalgam Terror Attack – पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने…
Read More
devendra fadanvis

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार; पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल

नागपूर : महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा झाला पाहिजे असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सांगत होते. अण्णा हजारे समितीने दिलेला…
Read More