३१ मार्चपूर्वी करुन घ्या ‘पॅन-आधार लिंक’, नाहीतर पगार मिळायलाही अडचणी येतील! जाणून घ्या प्रोसेस

इनकमटॅक्स डिपार्टमेंट जवळपास ४ वर्षांपासून पॅन-आधार लिंक करण्यासाठी मोहिम राबवत आहे. परंतु पुन्हा पुन्हा सांगूनही अनेक लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे इनकमटॅक्स डिपार्टमेंटने आता सक्तीचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची सवलत दिली गेली आहे. जर ३१ मार्चपूर्वी तुम्ही पॅन आधार लिंक केले नाही तर तुम्हाला १ हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. याबरोबरच तुम्हाला पॅन आणि आधार कार्डच्या सर्विसेसही वापरता येणार नाहीत.

तसेच आधार पॅनशी लिंक नाही केले तर खालील समस्या उद्भवू शकतात:-

आधार-पॅनशी लिंक केले नाही तर काय समस्या येतील?
-५ लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करता येत नाही
-बँकेत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करता येणार नाहीत.
-पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास कर विवरणपत्र भरले जाणार नाही
– म्युच्युअल फंड किंवा वित्तीय योजनांमध्ये गुंतवणूक पॅनशिवाय करता येत नाही.
– सरकारी योजना, पगार आदींमध्ये अडचणी येऊ शकतात.
– ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीची एफडी करू शकणार नाही

आधार पॅनशी लिंक करण्याची प्रक्रिया

आधार पॅनशी लिंक करण्यासाठी या वेबसाइटवर क्लिक करा
https://www.incometax.gov.in/iec/foportal/
क्विक लिंक्स सेशनमध्ये जाऊन लिंक आधार स्टेटसवर क्लिक करा
मग तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर आणि पॅन नंबर टाका
मग verify करा I Validate my adhar details ऑप्शनवर क्लिक करा
मग तुमच्या नंबरवर ओटीपी येईल
आणि तुमचे आधार-पॅनशी लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण झाली