काही गद्दार आमदारांची भाषा ऐकून, प्रश्न पडतो की … ; आदित्य ठाकरेंचे शिंदे गटावर शरसंधान

मुंबई – शिंदे गटातील काही आमदार हे त्यांच्या कृतीमुळे तसेच वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने अडचणीत आले आहेत. तर आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) हे एका व्यक्तीला मारहाण केल्याने टीकेचे धनी बनले आहेत. यावरून विरोधक देखील आक्रमक झाले असून शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

नोंदणीकृत कामगारांना भोजन पुरविणाऱ्या कंत्राटदाराने राखलेला दर्जा निकृष्ट असल्याचे सांगत आमदार संतोष बांगर यांनी कंत्राटदार कर्मचाऱ्यास चापटा मारत केलेल्या मारहाणीवरून सरकारच्या कार्यशैलीबद्दल नवे प्रश्न विचारले जात आहेत. आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी दहिसरमधील एका कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे. आता याच सर्व घडामोडींवरून आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले, काही गद्दार आमदारांची भाषा ऐकून, प्रश्न पडतो की गुंडगिरी आणि सत्तेची नशा एवढी आहे का, की त्यांच्या नव्या पक्षाचा आणि सरकारचा अंकुश नाही? जनतेला अशा भाषेत धमकावून काय सांगायचं आहे? हा सत्तेचा माज आहे की, काही न मिळाल्याचे नैराश्य? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.