रामाच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेमध्ये रामराज्य येणार – आदित्य ठाकरे

अयोध्या – राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Environment Minister and Shiv Sena leader Aditya Thackeray) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल (Shiv Sainik arrives in Ayodhya) झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे, त्यामुळे अयोध्येला आम्ही राजकारणासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत असं राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. अयोध्यात महाराष्ट्र सदन बांधणार असल्याचं ते म्हणाले. तसेच रामाच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेमध्ये रामराज्य येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहेत, पत्रव्यवहार करणार आहेत. या पावनभूमीत महाराष्ट्र सदनसाठी देखील जागा बघणार आहेत. साधारणपणे शंभर खोल्यांचं महाराष्ट्र सदन इथे आम्हाला बनवायचं आहे. महाराष्ट्रातील इथे अनेक भाविक येत असतात. त्यांना राहण्यासाठी एक जागा इथे निर्माण करायची आहे.