आमिर खानने पत्नी किरण रावसोबत साजरा केला मुलगा आझादचा वाढदिवस

मुंबई : आमिर खान आणि किरण राव यांची काही महिन्यांपूर्वी विभक्त झाल्याची बातमी ऐकून चाहते आश्चर्यचकित झाले होते. आमिर आणि किरण पुन्हा एकदा त्यांचा मुलगा आझादचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र दिसले. आमिर आणि किरणने  आझादचा 10 वा वाढदिवस एकत्र साजरा केला. यावेळी शोभाडे देखील उपस्थित होत्या.

या फोटोमध्ये आमिर खान मुलगा आझादसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आझादचे आई-वडील एकत्र आणि केक कापताना खूप आनंदी दिसत आहेत.

शोभा डे यांनी या क्षणांचे दृश्य शेअर करून या अप्रतिम संध्याकाळचे आणि घरगुती जेवणाचे कौतुक केले आहे. आमिर आणि किरण भले वेगळे झाले असतील पण ते आपल्या मुलासाठी प्रत्येक प्रसंगात उभे असतात. आझादचा वाढदिवस असो किंवा फुटबॉल सामन्यात त्याला चिअर करण्याची संधी असो, दोघेही नेहमीच सोबत असतात.

वर्क फ्रंटवर, आमिर खान त्याचा पुढचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ च्या रिलीजची वाट पाहत आहे. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्वैत चंदनचा हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत करिनाही दिसणार आहे.