आमिर खानच्या लेकीचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत झाला साखरपुडा, पाहा फोटो

मुंबई: बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) याची मुलगी आयरा खान (Amir Khan Daughter Engagement) हिचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. आयराने तिचा प्रियकर नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याच्यासोबत शनिवारी (१९ नोव्हेंबर) साखरपुडा केला आहे. आयरा आणि नुपूर बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वीच नुपूर शिखरेने आयराला प्रपोज करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

नुपूर शिखरेने आयरासोबतच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आयराने लाल रंगाचा गाऊन घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तर नुपूर शिखरेही काळ्या रंगाच्या कोट आणि पँटमध्ये स्मार्ट दिसत आहे. त्यांच्या साखरपुड्याला आमिर खानने सहकुटुंब हजेरी लावली होती.

आमिक खानसह त्याच्या दोन्ही पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यादेखील साखरपुड्याला आल्या होत्या. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता ही आयराची आई आहे. तर किरण राव तिचा मुलगा आझाद रावलाही घेऊन आली होती. आमिर खानची आईदेखील या सोहळ्यात सहभागी झाली होती. खान कुटुंबाव्यतिरिक्त फातिमा सना शेख, इमरान खान या सेलिब्रिटींनीही साखरपुड्याला उपस्थिती लावली होती.