गुजरातमधील घराघरात आता आप पक्षाची चर्चा होत आहे; केजरीवालांचा दावा 

राजकोट – सर्व राज्यांतील निवडणुका लढवल्यानंतर आता आम आदमी पक्षाच्या(AAm aadmi party) नजरा या वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभा(Gujrat assembali election) निवडणुकीकडे लागल्या आहेत. त्यामुळे पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल(aam chief Arvind Kejriwal) यांनी गुजरातमधील(Gujrat) राजकोटमध्ये(Rajkot) जाहीर सभेला संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी गुजरातमधील सरकारी शाळांच्या(Goverment school) स्थितीची दिल्लीशी तुलना करत भाजप सरकारवर(Bjp Goverment) निशाणा साधला.

यासोबतच केजरीवाल यांनी दिल्लीचे मॉडेलही)delhi model) जनतेसमोर ठेवले.   दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आजकाल गुजरातच्या घराघरात आप पक्षाची चर्चा होत आहे. सगळीकडे आम आदमी पक्षाचीच चर्चा आहे. दिल्लीचे लोक खूप प्रेम करतात, पंजाबचे(punjab) लोक खूप प्रेम करतात, आता गुजरातचे लोकही करत आहेत. ते म्हणाले की, गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार स्थापन व्हावे, ही एकच विनंती आहे.दिल्लीत आम्ही खासगी शाळांना ७ वर्षे फी वाढ करू दिली नाही. ज्या शाळेने असे करण्याचा प्रयत्न केला ती शाळा दिल्ली सरकारने ताब्यात घेतली. हे काम भाजप सरकारलाही करता आले असते, पण त्यांची मिलीभगत आहे. भारतीय जनता पक्ष हा श्रीमंतांचा पक्ष आहे.

सीआर पाटील(C R Patil) यांच्यावर हल्लाबोल करताना आम आदमी पक्षाचे निमंत्रक म्हणाले की, सीआर पाटील म्हणतात केजरीवाल गुंड आहेत. काही गुंड चांगल्या शाळा बांधतात, काही ठग लोकांसाठी काम करतात का? सीआर पाटीलजी मला दहशतवादी(Terrorist) म्हणतात. लोकांना अयोध्येत रामचंद्रजींचे(Lord Ram) दर्शन घडवणारा असा दहशतवादी कोण? राजकारण कसं करायचं ते मला कळत नाही. असं केजरीवाल म्हणाले.