AAP चा पंजाबचा मुख्यमंत्री चेहरा कोण ? केजरीवाल करणार घोषणा

नवी दिल्ली- AAP च्या पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव मंगळवारी दुपारी जाहीर केले जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सांगितले. केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘आप’चा पंजाबचा मुख्यमंत्री उद्या दुपारी जाहीर केला जाईल. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी या घोषणेला महत्त्व आहे . पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार असून १० मार्चला मतमोजणी होणार आहे.

पंजाबमध्ये २०१७ मध्येविधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 77 जागा जिंकून राज्यात पूर्ण बहुमत मिळवले आणि 10 वर्षांनंतर एसएडी-भाजप सरकारला सत्तेतून बाहेर काढले. आम आदमी पार्टी 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 20 जागा जिंकणारा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. शिरोमणी अकाली दल (एसएडी) केवळ 15 जागा जिंकू शकला, तर भाजपला 3 जागा मिळाल्या.

भारतीय निवडणूक आयोगाने ( ECI) पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा 20 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, राज्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते.काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस यासह अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक पुढे ढकलण्याची आयोगाला विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.