‘पुत्रीच्या प्रेमापोटी अनील देशमुखला गृहमंत्री बनवले जाते आणि महाराष्ट्राची प्रतिमा देशात खराब होते’

मुंबई : २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुलोद नंतर सर्वात ऐतिहासिक असे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही भिन्न विचाराचे पक्ष एकत्र येत गेल्या दोन वर्षात राज्यात एक स्थिर सरकार दिले आहे. आज महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले होते. मात्र या दोन वर्षातील सरकारच्या एकूण कारभारावर विरोधकांकडून प्रचंड टीका होत आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. काही वर्षापूर्वीचे प्रसिद्ध नाटक ‘तीन पैशाचा तमाशा’ अशीच आजच्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे सत्तेचा उपभोग, त्यातून संपत्तीचे निर्माण हेच सुरु होते. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र पुत्री पुतण्या यांच्या भोवती फिर आहे. असा जोरदार टोला आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची बदनामी याच पुत्र प्रेम आणि पब, पार्टी, पेग आणि पेग्वीन यामुळे झाली आहे. मंदीरासाठी लोक आंदोलन करतात पण सरकारची भुमिका मदीरालय सुरु करायची होती. आमचा विरोध या गोष्टींना नाही तर प्राध्यान्यक्रमाने आहे. सुपुत्रीच्या प्रेमात काही चुक नाही मात्र पुत्रीच्या प्रेमापोटी अनील देशमुखला गृहमंत्री बनवले जाते आणि महाराष्ट्राची प्रतिमा देशात खराब होते. पुतण्या बद्दल काय सांगावे त्यांच्या भितीने त्यांना वरच्या पदावर बसवले जाते. असा थेट हल्ला शेलार यांनी चढवला आहे.

हे देखील पहा