पेंग्विन सेनेने आता कबर बचाव अभियान सुरू करावं;आशिष शेलार  यांची टीका 

मुंबई – मुंबई बॉम्बस्फोटातला (Mumbai Bomb Blast) गुन्हेगार आणि कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Meman) कबरीचं सुशोभिकरण केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता याच मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहीले.सत्तेतील शिवसेना जेव्हा विरोधीपक्षात गेल्यावर , मात्र आता ते दाऊदचे प्रचारक झाले आहेत. असं ते म्हणाले.

ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात , महाराष्ट्रात, मुंबईत बाँम्ब स्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार, 1993 च्या मुंबई बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी  उद्धव ठाकरे यांनी कशी दिली?मैदानै, उद्याने, स्मशानभूमी यांचे सुशोभिकरण, देखभाल, दुरुस्ती संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करताय?असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरू करावं. याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारे अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री होती. ते सांगायचे की, आदित्य ठाकरे आपले भाऊ आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम झाले आणि  उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद मिळाला, तर याकूबच्या कबरीचे सौंदर्य करणं होणार ना? तुम्ही 25 वर्ष सत्तेत बसलात, महापौर तुमचा तरी ही याची खबर कशी नाही मिळाली? ही जबाबदारी तुमचीच आहे. असं शेलार म्हणाले.

माझी खुर्ची, माझा परिवार यापलीकडे पेंग्विन सेनेला अस्तित्व नाही. पेंग्विन सेना वानखेडे उखडून टाकायला गेले होते ना मग आता ही कबर उखडून दाखवा. तुकडे तुकडे गॅंगच्या दबावाखाली हे केले आहे. अफजल तेरे कातील जिंदा है हम शर्मिनदा है…असे हे तुकडे तुकडे गॅंग म्हणाले आहेत. नवाब मलिक, अस्लम शेख, आणि तूकडे तुकडे गँगला खूश करण्यासाठी करण्यात आले आहे.याकूबला जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती.सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर याकूबच्या फाशीच्या कारवाई झाल्याअस्लम शेखने विरोध केला होता हे विसरून चालणार नाही.असं ते म्हणाले.