देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील – अब्दुल सत्तार

नांदेड : महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील 30 विधानसभा आणि तीन लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 नोव्हेंबर रोजी या जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. कॉंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.

या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे. कॉंग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजप कडून शिवसेना सोडून भाजपवासी झालेले सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नुकतेच साबणे यांनी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेना सोडताना सुभाष साबणे यांचे पाणावलेले डोळे संपूर्ण राज्याने पहिले होते. मात्र आता सुभाष साबणे यांना शिवसेनेच्या नेत्यांनी चांगलच फैलावर घ्यायला सुरवात केली आहे.

उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे. उद्धवजींचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाही, असं सांगतानाच देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना ठणकावले. अब्दुल सत्तार आज निवडणूक प्रचारासाठी देगलूर येथे आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

हे देखील पहा