अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या PA वर भडकले, शिवीगाळ केल्याच्या चर्चा

मुंबई : कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना केली शिवीगाळ केल्याचे वृत्त समोर आलं आहे. एका बैठकीत अब्दुल सत्तार यांनी त्यांचं काम केलं नसल्याचा राग ठेवत ओएसटी यांना शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात होती, त्यावेळी त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येत होता. मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केली आणि नंतर ते तिथून निघून गेले, असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं यामुळं एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.