‘माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा, सर्व प्रश्न लगेच सुटतील’, अभिजीत बिचुकलेंचं मोठं विधान

पुणे- बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरुन मोठं विधान केलं होतं. राज्यातील सगळे पक्ष घरी बसवा आणि २०२४ला महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या, असं वक्तव्य करत बिचुकले ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री पदावरुन मोठं विधान केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरुन आंदोलन (MPSC Students Protest) करत आहेत. या आंदोलनात सहभागी होत बिचुकलेंनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून सरकारला खोचक सवाल केला आहे.

मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) साताऱ्याचे आहेत. मी पण साताऱ्याचा आहे. त्यांच्या सुनेला म्हणजे माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा सर्व प्रश्न लगेच सुटतील. माझी पत्नी मुख्यमंत्री झाल्यावर पहिला प्रश्न या विद्यार्थ्यांचा सोडवणार, असा दावा अभिजीत बिचुकले (Abhijit Bhicukale Wife) यांनी केला. तसेच आयोगाने या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मधला मार्ग काढला पाहिजे. आयोग म्हणतंय २०२३ आणि विद्यार्थी म्हणतायत २०२५. मात्र यामध्ये २०२४ पासून नवा अभ्यासक्रम लागू करून मधला मार्ग काढावा, अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे.