विद्यापीठाच्या भोजनगृहातील वाढलेले शुल्क रद्द करा-अभाविप

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) भोजन थाळी किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत या विरोधात काल कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार (Dr. Praful Pawar)  यांना अभाविप कडून निवेदन देण्यात आले.

विद्यापीठातील भोजन गृहामध्ये विद्यापीठातील ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना भोजन व्यवस्था करण्याच्या उद्देशाने भोजनाची सोय केलेली आहे. भोजनगृहातील गेस्ट साठीची  मिनी थाळी 25 रू. याप्रमाणे विद्यार्थ्यांना मिळत असे. मात्र आता मिनी थाळी च्या किंमतीत 10 रू. ची वाढ करून 35 रू. असे शुल्क करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठी आर्थिक झळ पोहचत असून त्यांना हे वाढलेले शुल्क भरणे शक्य नाही. असं अभाविपने (ABVP) दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान,  विद्यापीठ प्रशासनाने यामध्ये तत्काळ लक्ष देऊन सदर शुल्कवाढ थांबवावी व पूर्वी प्रमाणे लागू असलेले भोजन शुल्क लागू करावे असे पत्र आज विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिले आहे. विद्यार्थी हिताचा विचार करून प्रशासनाने कुठेतरी पैसे कमी करून योग्य निर्णय घ्यावा अन्यथा अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, अशा इशारा अभाविप पुणे विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा (Mahadev Ranga) यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी उपाध्यक्ष पवन निमसे, अमोल बोऱ्हाडे, प्रफुल्ल राठोड, व्यंकटेश शिंदे (Pawan Nimse, Amol Borhade, Praful Rathod, Venkatesh Shinde) व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.