फुलेवाडा आणि सवित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या : अजित पवार

फुलेवाडा आणि सवित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाला गती द्या : अजित पवार

पुणे : राष्ट्रीय स्मारक फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करुन या कामास तात्काळ प्रारंभ करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिल्या. मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्यावतीने सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा उभारण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

पुणे येथील राष्ट्रीय स्मारक असलेल्या फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाबाबत आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी फुलेवाडा आणि स्मारकाचे विस्तारीकरणासाठी लवकरच भूसंपादन करण्यात यावे अशा सूचना दिल्या. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात येईल असे आयुक्त आणि जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा: छगन भुजबळ

1948 साली भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यानुसार येथे सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत केल्या.

उपमुख्यमंत्री पवार यांनी या इमारतीत असलेले वाणिज्यिक गाळेधारक तसेच रहिवासी यांच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा. यासंदर्भात न्यायप्रविष्ट प्रकरणात सहमतीने तोडगा काढता येईल. या वाड्यात शाळेच्या रुपाने एक चांगले स्मारक उभे राहील यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे. बैठकीस भिडेवाड्यातील गाळेधारक दुकानदार तसेच राहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post
ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांचा गेल्या वर्षभरात पर्दाफाश केला - किरीट सोमैया  

ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांचा गेल्या वर्षभरात पर्दाफाश केला – किरीट सोमैया  

Next Post
पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या पक्षाला मिळालेले आहे हे आपले भाग्य आहे - भुजबळ

पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या पक्षाला मिळालेले आहे हे आपले भाग्य आहे – भुजबळ

Related Posts
श्रीलंकन क्रिकेटपटूची वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, मोठे आहे कारण

श्रीलंकन क्रिकेटपटूची वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, मोठे आहे कारण

श्रीलंका क्रिकेट संघाचा अनुभवी गोलंदाज वानिंदू हसरंगा (Wanindu Hasranga) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हसरंगा आपल्या…
Read More
नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक

नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या…
Read More