बिलकीसप्रकरणातील आरोपींना मुक्त करणे हिंदुत्ववाची खरी बदनामी – यशोमती ठाकूर

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षामुळे घसरत चाललेला राजकारणाचा दर्जा वाढविण्याची जबाबदारी सर्वस्वी लोकप्रतिनिधींची आहे, मग सत्ता कुणाचीही असो असे विधान माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज सभागृहात केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानिमित्ताने अंतिम आठवडा प्रस्तावावर त्या बोलत होत्या. त्यावेळी विधिमंडळाच्या पायरीवर झालेल्या गोधळाकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेदिवस बिघडत चालली आहे, ज्यावेळी नवीन सरकारचे दोन मंत्री राज्यात कार्यरत होते, तेव्हापासून महिला अत्याचार व अन्य गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. अगदी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सतेवर आल्याचा कांगावा करणाऱ्या सरकारच्या महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे बिलकीस बानो प्रकरणातील (Bilkis Bano case) आरोपींनामुक्त करणे ही हिंदुत्ववाची खरी बदनामी आहे. असे ठाकूर यांनी सभागृहात स्पष्ट केले. आम्हाला काँग्रेस (Congress) पक्षाने संयम शिकवला आहे. सर्वधर्मसमभाव शिकवला आहे. असेही त्या म्हणाल्या.

महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणाच्या गोष्टी सांगणाऱ्या सरकारच्या काळात पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेला साधा सुद्धा मिळत नाही ही शोकांतिका आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी वुमन सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली. राज्याला सुरक्षा करणाऱ्या पोलिसांची घरे राहण्या योग्य नाहीत, असुरक्षित आहेत.  आज तुमची सत्ता आहे, काल आमची होती, पण १०व्या सूचीला धक्का लावत संविधान बदलण्याचे षड्यंत्र सध्या सुरू आहे. काही अधिकारी बदमाशी करून लोकप्रतिनिधींना अडकवत आहेत. टीईटी घोटाळ्याचा गोंधळ बाहेर आला पाहिजे अशीही मागणी त्यांनी सभागृहात केली.